ईदच्या दिवशीच शुल्लक बाचाबाचीत  निर्घृण हत्या….

0
21

मुंबई देवेंद्र मोरे जोगेश्वरी (मुंबई):-

            सर्वत्र ईद या सणाचा उत्साह असतांना पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी मात्र हत्येच्या घटनेने हादरले.ओशिवरा या ठिकाणी रविवारी सायंकाळी एका इफ्तार पार्टी दरम्यान दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका २० वर्षीय तरुणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. मोहम्मद कैफ रहीम शेख (२०) असे मृत तरुणांचे नाव असून पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फळ वाटपावरून वाद सुरू असतांना मोहम्मद शेख यांने जफर फिरोझ खान (२२) याला चापट मारली. याच रागाने जफर खान याने आपल्या इतर मित्रांच्या साथीने मोहम्मद शेख याच्यावर तिक्ष्ण धारदार शस्त्राने वार केले…

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शेख याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला…या दुर्दैवी घटनांमुळे ओशिवरा परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.