महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे… तालुक्यात राष्ट्रवादी आणि उबाठा गटाला मोठा धक्का बसलाय…दासगाव आणि मोहोप्रे येथील राष्ट्रवादी आणि उबाठा गटातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे…
महाड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष धीरज पाटील मोहोप्रे ग्रामपंचायत सदस्य शकुंतला पाटील तसेच विजय पाटील, सुशील पाटील, मनोज भिलारे, सखाराम पाटील उबाठा मधून दासगाव ग्रामपंचायत माजी सरपंच विजय तुकाराम चांडवेकर , माजी पंचायत समिती सदस्य सौ. विनिता विजय चांडवेकर, माजी सरपंच किशोर राजाराम जाधव तसेच प्रदीप महादेव नगरकर प्रतीक्षा नगरकर शलाखा मुंडे राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्षा सुजाता मुंढे, संदीप नगरकर, सेजल नगरकर, दिलीप नगरकर, दीक्षा नगरकर इत्यादींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला…या पक्षप्रवेश समारंभावेळी नाते आणि तासगाव विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.