ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर आरएमसी प्लांटला विरोध… विरोध केल्यामुळे अमित म्हात्रे यांच्या जीवितास धोका…

0
26

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

ग्रामपंचायत कावीर येथील अमित अशोक म्हात्रे यांच्या कावीर ग्रामपंचायत हद्दीत आर पी पी  इंफ्रा प्रोजेक्ट चेन्नई / रिप्लेन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, चेन्नई या कंपनीमार्फत बेकायदेशीर आर एम सी प्लांट उभारण्यात येत आहे… या बेकायदेशीर प्लांट विरोधात  म्हात्रे यांनी सातत्याने आवाज उठवला असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील केल्या आहेत… त्यांच्या या विरोधामुळे संबंधित कंपनीशी संलग्न असलेल्या काही व्यक्ती आणि अमित म्हात्रे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच सतत धमक्या दिल्या जात असून, जीवितास धोका निर्माण झाला आहे… सदर प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून, मला सुरक्षा पुरवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली… सदर तक्रारी सोबत संबंधित बेकायदेशीर प्लांट विषयी आवश्यक पुरावे (दस्तऐवज, छायाचित्रे, तक्रारींच्या प्रती ) संलग्न केल्या आहेत तरी यासंबंधित त्वरित आवश्यक ती कारवाई करावी, असे अमित म्हात्रे यांनी अलिबाग रायगड पोलीस मुख्यालयाला दिली आहे…