किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश… किहीम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण…

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

आपल्या कर्तव्याप्रती नेहमीच जागृत असणारे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच पिंट्या गायकवाड यांनी चोंढी पूल ते सातीर्जे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे दर्जेदार काम आपल्या कार्यशैलीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने पूर्ण केले…याबद्दल त्यांचे सातीर्जे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले आहेत…

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामे मार्गस्थ केली आहेत…तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत…तसेच विविध योजना व विकासकामे प्रशासकीय मंजुरीकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे. किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चोंढी पूल ते सातीर्जेकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडून तो वापरण्यास अडथळे निर्माण झाले होते, यासाठी पिंट्या गायकवाड यांनी आपली कार्यपद्धतीचे अवलंब करून रस्त्याच्या कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवत तो रस्ता मंगळवार दि.२ एप्रिल २०२५ रोजी खडीकरण व डांबरीकरण केला आहे, तसेच या रस्त्यावर येत्या काही दिवसात अंतिम डांबरीकरण कार्पेट पूर्ण करण्यात येणार आहे. सरपंच पिंट्या गायकवाड यांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दूर केली, याबद्दल त्यांचे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले आहेत…