आ. महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खालापुरात महाआरोग्य शिबिर…शेकडो गरीब, गरजू लोकांना मोफत उपचार व औषधांचे वाटप… 

0
30

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खालील सुर्वे) :-

शिवसेना खालापूर शहर व नगर पंचायत यांच्या सौजन्याने कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त नेताजी पालकर सभागृह येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले होते… या शिबीरामध्ये शेकडोहून अधिक गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले… या कार्यक्रमाची सुरुवात खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (PI) सचिन पवार, खालापूर शहराध्यक्ष पद्माकर पाटील, नगराध्यक्षा रोशन मोडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली…. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व सुरज हॉस्पिटल टीमचे डॉ.आर्यन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय देवरे, डॉ.  शर्वरी शिंदे,डॉ.  पंकज शिंदे तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले….

या महाआरोग्य शिबिरानिमित्त आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजीच्या  जागरूकता निर्माण करण्याचा देखील उद्देश होता… हे शिबिर मोफत सेवा देऊन आर्थिक अडचणींमुळे वैद्यकीय मदत घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहित करते… हा उपक्रम केवळ तात्काळ आरोग्य समस्यांना संबोधित करीत नाही तर समुदायातील सदस्यांमध्ये आरोग्य जाणीव आणि सक्रिय आरोग्यसेवा व्यवस्थापनाची संस्कृती देखील वाढवतो, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली…

या महाआरोग्य शिबिराकरीता खालापूर नगरपंचायतीचे गटनेते किशोर पवार, संपर्क प्रमुख दीपक पाटील, शहर संघटक पुंडलिक लोते, खालापूर समन्वयक हरेश मोडवे, शहर युवा सेना अधिकारी अमित जगताप, उपशहर प्रमुख राजू पारठे, रोहिदास मिरकुटे, यशवंत जाधव, वासुदेव पाटील तसेच नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती उज्वला निधी, नगरसेविका मीना वाघमारे, सुनिता पाटील, लता लोते, खालापूर प्राथमिक केंद्राच्या सेविका नेहा गायकवाड, अंजली गायकवाड, संगीता गायकवाड, लीना पाटील, प्रियांका पानपाटील, धनंजय कदम व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

या शिबिरात खालापूर शहरासह वनवेवाडी, शिरवली वाडी, दांडवाडी, महड, निंबोडे येथील नागरिकांनी सहभाग नोंदविला… १५९ लाभार्थींनी नोंदणी करून तपासणी करून घेतली तसेच २० रुग्णांचे नेत्रबिंदूचे ऑपरेशन सुरज हॉस्पिटल सानपाडा येथे मोफत करण्यात येणार आहेत… या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना खालापूर शहर व युवा सेना पदाधिकारी यांनी मेहनत घेतली…