माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
श्रीरामनवमीच्या पवित्र पर्वावर माणगाव शहरात ६ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे…साई मंदिर ते सोनभैरव मंदिर, खांदाड या मार्गावर ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे…या शोभायात्रेचे आयोजन रामनवमी उत्सव कमिटीने केले असून,हिंदू संस्कृती आणि परंपरेचा जागर करणारी ही शोभायात्रा होणार आहे…रामनवमी उत्सव कमिटीने माणगावकरांना मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.रविवार, दि.६ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता शोभायात्रेची सुरुवात होईल. ही शोभायात्रा साई मंदिर आदर्श समता नगर येथून सुरू होऊन विकास कॉलोनी मार्ग, कचेरी रोड, बालाजी कॉम्प्लेक्स, मुख्य बाजार पेठ, मोर्बा रोड कॉर्नर, शेलार नाका, खांदाड मार्गे सोनभैरव मंदिर, खांदाड येथे पोहोचेल…यानंतर रात्री ८ वाजता महाआरती आणि महाप्रसादाने उत्सवाचा समारोप होईल…दरम्यान या उत्सवाचे औचित्य साधून माणगाव शहरात विविध ठिकाणी भव्य सजावट करण्यात आली आहे. मुख्य बाजार पेठेतील रस्त्यांवर भगवा ध्वज, श्रीराम यांच्या फोटोसह भगवे झेंडेसमेत मोठी कटआउट्स लावण्यात आले आहेत…याशिवाय,रस्त्यांवर विद्युत रोषणाई आणि स्वागत कमानी देखील उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरात रामनवमीच्या उत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामनवमी शोभायात्रेच्या आयोजनासाठी माणगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.