पेणमध्ये अवकाळी पावसामुळे दाणादाण… सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे, विद्युत पोल कोसळले…  

0
25

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

पेण मध्ये सायंकाळी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच आलेल्या सोसाट्याचा  वाऱ्यांमुळे झाडे तसेच विद्युत पोल पडल्याची घटना घडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला तर पेणकर नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे… गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाच आज पेण तालुक्यात तुफान वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला…

एकीकडे कार्लाच्या एकविरा आईची यात्रा सुरू झाली असून या यात्रेकरिता सकाळपासून पेण तालुक्यातून हजारो आगरी कोळी बांधवांची आईच्या दर्शनासाठी रिघ… तर या यात्रेनंतर पेणच्या ग्रामीण भागातील यांत्राचा धमाका सुरू होणार असल्याने अनेक भाविक यात्रेच्या तयारी करता लागले आहेत… परंतु आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेणमध्ये जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे…

यामुळे रस्त्यावर भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसलेल्यांची व दुकानदाराची पळापळ झाली… या वादळी वाऱ्यामुळे शहरातील कासार आळी मधील बिल्डिंगची पत्र्याची शेड कोसळली असून जुन्या आरटीओ कार्यालया जवळ मोठे झाड उन्मळून पडले… तर तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठी वित्तहानी झाल्याचे कळतंय…या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्याच्या अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाण्याचे ओहलं वाहू लागले…