ढगांच्या गडगडाट व वीजांच्या कडकडाटांसह  जोरदार पाऊस… अचानक आलेल्या पावसाने वाटसरुंची तारांबळ…  

0
19

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

खालापूर  तालुक्यात दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाले व ढगांच्या गडगडाट वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला जोरात सुरुवात झाली… बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले… त्यामुळे शहरातील व्यावसायिकांची व शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली…

गेल्या आठवडाभरापासून खालापूरमध्ये तापमानामध्ये बदल झाले आहे… कोकणात मागील काही दिवस उष्णतेच्या वाढली आहे… ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळीशी वर चढल्याने गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहण्यास मिळाले… हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाचा इशारा देखील दिला होता… मात्र शुक्रवारी खालापूर तालुक्यासह शहरातही अचानक आलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातला व तालुक्या सह शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले… त्यामुळे शहरातील व्यावसायिकांची मोठी धावपळ झाली…

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचल्याचे चित्र दिसून आले… अचानक आलेल्या अवकाळी पाऊसामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांची देखील चांगलीच तारांबळ उडाली रेनकोट, छत्री नसल्याने पाऊसात भिजत प्रवास करावा लागल्याचे दिसून आले… पाऊसा मुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले… वादळवारा व पावसामुळे‎ तालुक्यासह शहरातील वीज प्रवाह खंडित झाला होता.‎.. रस्त्यावरचे व्यावसायिक आणि भाजी विक्रेते यांना पावसामुळे गाशा गुंडाळावा लागला… वादळवारा व पावसामुळे वातावरण‎ बदलले होते… दुपारच्या उकाड्यानंतर‎ पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा‎ निर्माण झाला होता…