पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्य विधान केल्यामुळे शेतकर्यांचे मन दुखावली गेली आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांच्या जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक व उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, रामदास गोंधळी, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, कुणाल कुरघोडे, निखिल भगत, दौलत होटकर, राम जाधव, राजेश शेट्टीगार, गोविंद जोग, मृन्मय काणे, भास्कर पाटील, मयूरेश पाटील, माहिला आघाडी तालुका संघटिका सौ. प्रमीला कुरघोडे, कळंबोली शहर संघटिका सौ. ज्योति मोहिते, सौ. उजव्ला गावडे, सौ. श्रद्धा कदम, शहर संपर्क संघटिका सौ. रत्नमाला शिंदे, समीक्षा पगम, सुप्रिया भगत, समिना कुडाळकर, यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.