गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते नवीन रस्त्याचे लोकार्पण… रामनवमीचे औचित्य साधून मतदारसंघातील विकासाची प्रचिती…

0
23

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

श्री. धाराई जाखमाता विकास मंडळ आणि सुविधा महिला मंडळ, दमामे मधलीवाडी येथील श्री रामनवमी जन्मोत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजेचे औचित्य साधून येथील मुख्य रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व वाडी अंतर्गत नवीन रस्त्याची फीत कापून उद्घाटन मा. ना. श्री.  योगेशदादा ज्योती रामदासभाई कदम, राज्यमंत्री गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. ना. योगेशदादाचे सर्व महिलांनी पुष्प वृष्टीने स्वागत केले… यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य प्रभाकर गोलांबडे, श्री. निलेश शेठ, शिवसेना विभाग प्रमुख उन्हवरेचे मोहन भागणे, उपतालुका महिला संघटिका सौ. ममताताई शिंदे, शाखाप्रमुख सतीश पड्याळ, ग्रामपंचायत सदस्य गायत्री जाधव, उपसरपंच गंगाराम हरावडे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश हरावडे, पोलीस पाटील संतोष बुरटे, माजी शाखाप्रमुख विष्णू हरावडे, माजी अध्यक्ष अनंत पड्याळ, जानू जाधव, भडवळेचे उपसरपंच श्री. नाचरे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष शरद विटमल, उपाध्यक्ष संतोष देवळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन पड्याळ, उपाध्यक्ष नितीन देवळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा शर्मिला निकम, उपाध्यक्षा ज्योत्स्ना देवळे, यांच्यासह वाडीतील कार्यकर्ते सतीश पड्याळ, दिनेश निकम, प्रदीप विटमल, राजेश निकम, शंकर बालगुडे, गायत्री जाधव तसेच ग्रामस्थ महिला वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते…