रविंद्र राऊत इंग्रजी माध्यमिक शाळेसाठी सहकार्याची ग्वाही   शाळेच्या विज्ञान-प्रयोगशाळेचे उद्घाटन खा. तटकरे यांच्या हस्ते 

0
22

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):- 

कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबई संचलित श्रीवर्धन  येथील रविंद्र राऊत इंग्रजी माध्यमिक शाळेला भविष्यातही शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही रायगडचे खासदार आणि ओ.एन.जी. सी.चे चेअरमन श्री.सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन येथे बोलतांना दिली… वरील शाळेच्या सायन्स प्रयोगशाळेचे उद्घाटन खा.तटकरे यांचे हस्ते झाले तेव्हा झालेल्या कार्यक्रमांत ते बोलत होते… प्रारंभी शाळा कमिटीचे स्थानिक अध्यक्ष योगेश गंद्रे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले… समारंभाचे व संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. मुश्ताक अंतुले यांनी प्रास्ताविक करताना शाळेकरिता खा. तटकरे यांचेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले व यापुढेही खा. तटकरे यांजकडून विविध माध्यमांतून शाळेला वेळोवेळी मदत प्राप्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन लवकरच खा. तटकरे यांना केंद्रीय मंत्रिपद प्राप्त व्हावे अशी इच्छाही व्यक्त केली…

आपल्या ओघवत्या शैलीतील प्रभावी भाषणात बोलतांना खा. तटकरे यांनी बॅ. अंतुले यांच्या बालपणापासूनचा जीवनाचा प्रभावी आलेख सांगून पुढे ते स्वकर्तृत्वावर उच्च पदापर्यंत कसे पोहोचले याचा आढावा घेतला… तसेच श्री. मुश्ताक अंतुले चालवीत असलेल्या सदर इंग्रजी माध्यमिक शाळेला लागणारे सर्वप्रकाचे भौतिक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली… सदर शाळेच्या इयत्ता १०वी च्या यंदाच्या पहिल्या बॅचला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या… कार्यक्रमास दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक श्री. उत्तम रिकामे, महंमदभाई मेमन, आझाद वतारे, राजसी मुरकर, सबा फिरफिरे, शबिस्ता सरखोत, बाळकृष्ण चाचले, मुख्याध्यापिका सौ. रिकामे, शाळा कमिटीचे सदस्य, शिक्षक-वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित  होते…