रायगडच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग… अनिल नवगणे 15 एप्रिलला शिंदे गटात प्रवेश करणार…

0
59

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आलाय…रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे…दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात…जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हा वाद आणखीच चिघळला आहे…शिवसेना शिंदे गट भरतशेठ गोगावले यांच्यासाठी आग्रही आहे…तर,राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत…महायुती सरकारकडून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती…मात्र,शिंदे गटाच्या विरोधानंतर तटकरे यांचे नाव मागे घेण्यात आले…

आता रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तटकरे यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आता रायगडमध्ये मोठी खेळी खेळली आहे…रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार राहिलेले अनिल नवगणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. अनिल नवगणे यांनी अदिती तटकरेंविरोधात निवडणूक लढवली होती…मात्र आता सुनील तटकरेंना शह देण्याचा गोगावल्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या सुरु आहे…