आनंद पवार यांचा प्रज्ञासूर्य हा विशेषांक वाचकांनमध्ये लोकप्रिय… सोहळ्याप्रसंगी आंबेडकर चळवळीचे झुंजार नेते प्रकाश बिनेदार उपस्थित…  

0
36

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून रसायनी येथील पत्रकार आनंद पवार यांनी प्रकाशित केलेल्या प्रज्ञासूर्य अंकाचे प्रकाशन पनवेलचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे व विशालजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १५ एप्रिल रोजी नवीन पनवेल येथे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी आयोजित केलेल्या भीम जयंती महोत्सवा प्रसंगी करण्यात आले…

या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा आंबेडकर चळवळीचे झुंजार नेते प्रकाश बिनेदार भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा. अविनाश कोळी, मा. नगरसेविका दर्शना भोईर, भाजपाचे नगरसेवक मा. नगरसेवक नितीन पाटील, रवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते…

पत्रकार आनंद पवार हे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रज्ञासूर्य या विशेष अंकाचे प्रकाशन करत असतात प्रज्ञासूर्य या जयंती विशेष अंकामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारित महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीकांचे लेख कविता या प्रज्ञासूर्य अंकामध्ये प्रकाशित केले जातात… प्रज्ञासूर्य हा विशेषांक वाचकांसाठी लोकप्रिय ठरले असल्याची प्रतिक्रिया साहित्यिक लेखक व सामान्य वाचकांमधून व्यक्त होत आहे…