अलिबाग सारळ येथे बैलगाडा स्पर्धेचे आयोजन… स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यकर्ते स्पर्धकांचे सहकार्य…

0
120
Oplus_131072

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत पारंपरिक हौशी बैलगाडा संघटना व अमित नाईक मित्र मंडळ यांच्या सौजन्याने बैलगाडा स्पर्धेचे आयोजन अलिबाग सारळ येथे दि. १९ एप्रिल रोजी करण्यात करण्यात आले… या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ५०,००० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ३५,००० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप ठेवण्यात आले…

अलिबाग येथे वर्षानुवर्षे ही पारंपरिक हौशी संघटना आद्य नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मागणीनुसार स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येते… ही बैलगाडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यकर्ते व नागरिक व स्पर्धक यांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे अमित नाईक सांगितले…. या स्पर्धेत अनेक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता… यावेळी बैलगाडा रसिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते….