मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
जिकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने विजय मिळवला खरा, पण विजयानंतर त्यांचाच एक खेळाडू आता दुसऱ्या संघातून खेळणार असल्याचे समोर आले आहे.
उद्याच्या चुरशीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज्स हे दोन संघ आमनेसामने होणार आहेत. आणि नेमका हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्ज्स मधून खेळताना दिसेल.
मुंबई इंडियन्ससाठी मॅचविनर
ठरलेला डेवाल्ड ब्रेव्हिस हा खेळाडू आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या विरोधात मैदानावर खेळायला उतरेल. चेन्नईच्या संघाने त्याला आता
आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे विजया पाठोपाठ मुंबई इंडियन्स संघाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज्स यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईच्या मॅचविनर डेवाल्डला जर चेन्नईच्या संघातून संधी देण्यात आली तर मुंबईच्या संघावर तो नक्कीच भारी पडू शकतो कारण मुंबईच्या संघातील सर्व गोष्टी त्याला चांगल्याच माहिती आहेत.