रोहित शर्मा योग्यवेळी फॉर्मात आल्याने MI चा CSK वर दणदणीत विजय….

0
39

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

काल वानखेडेवरील धुमश्चक्रीत CSK वर MI ने ९ विकेट्सने १६व्या षटकातच आपल्या चौथ्या विजयाकडे झेपावत IPL-2025 च्या मोसमातील गुणतालिकेत ८ गुणांसह सहावा क्रमांक पटकावला….

नाणेफेक जिंकून MI चा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. MI च्या गोलंदाजांनी टिच्चून चेंडूफेक केलीच पण त्यांना अप्रतिम क्षेत्ररक्षणाची देखील विशेष साथ लाभली…. त्यामुळे फलंदाजीसाठी प्रथम उतरलेल्या CSK ने निर्धारित २० षटकात ५ बाद १७६ धावा केल्या….

CSK कडून रविंद्र जडेजाने ३५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची नाबाद खेळी केली तर शिवम दुबेने ३२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावांची खेळी केली…. त्याआधी IPL सारख्या विश्वस्तरीय मोठ्या टूर्नामेंट मध्ये पदार्पणात खेळताना १७ वर्षीय आयुष म्हात्रेनेही‌ प्रभावित करतांना १५ चेंडूत ३२ धावांची लक्षणीय खेळी केली….

MI कडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला १०च्या‌ धावगतीने आक्रमक फलंदाजी केली. पॉवर-प्लेच्या ७व्या षटकात‌ रविंद्र जडेजाने रिकल्टनला बाद केले, त्याने १९ चेंडूत ३ चौकार व १ षटकार फटकावून‌ तो आयुष‌ म्हात्रे कडून झेल बाद झाला…. नंतर मात्र आपापल्या विकेट्स सांभाळत चौकार-षटकारांची आतषबाजी करीत यादव आणि शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि CSK कडून झालेल्या चेपॉक वरील पराभवाची परतफेड केली…. या मोसमातील CSK चा मात्र हा ८ सामन्यातील ६ वा पराभव ठरला आहे…