स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा…रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड मंडणगड येथे नवीन स्वतंत्र बाजार समित्यांना मंजुरी…

0
17

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

दापोली, खेड आणि मंडणगड हा मतदारसंघ आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम व मासळी यांसारख्या कृषी व मत्स्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे… मात्र स्थानिक बाजारपेठांचा पर्याय उपलब्ध नसल्याने  येथील शेतकऱ्यांना आपली उत्पादने घेऊन विक्रीसाठी १५०-२०० कि.मी. अंतरावर असलेल्या रत्नागिरी येथील बाजार समितीकडे जावे लागत असे, परिणामी वाहतूक खर्च, वेळ व श्रम यांचा मोठा ताण त्यांना सहन करावा लागत असे…

याच पार्श्वभूमीवर राज्य गृहमंत्री योगेशदादा कदम यांनी दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांत स्वतंत्र कृषी उत्पादन समित्या स्थापन करण्यात याव्यात म्हणून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता…. परिणाम स्वरूप आता मुख्यमंत्री कृषी उत्पादन बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुकास्तरीय नवीन कृषी उत्पादन बाजार समित्यांची स्थापना करण्यात येण्याबाबत शासन अध्यादेश जारी करण्यात आला आहे…. यामुळे आता दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यांत अशा नव्या स्वतंत्र बाजार समित्यांना मंजुरी देण्यात आली आहे….

या शासकीय निर्णयामुळे आता तालुकेवार शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होऊन आर्थिक चालना मिळून वेळ, श्रम व पैसा यांतून दिलासा मिळणार आहे…. याकामी स्थानिक आमदार व राज्यगृहमंत्री योगेशदादा कदम यांनी महत्त्वाची प्रभावी भूमिका बजावली म्हणून स्थानिक शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत….