उरण, खोपोली आणि कर्जत नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी आमरण उपोषण… 

0
31

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण, खोपोली आणि कर्जत नगरपरिषद कंत्राटी कामगाराचे अथिॅक शोषण थांबविण्यासाठी दि. २२ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, आलिबाग येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे… गेली  १५ ते २० वर्षांपासून नगरपरिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार अतिशय प्रामाणिकपणे शहराची घाण साफ करत आहेत…

स्वतःचा जीव धोक्यात टाकून नगर वासियांचे आरोग्य जपण्याचे अनमोल काम करत आहेत… विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या वेळी हा कामगार जर कार्यरत नसता तर नागरीकांना जगणे अशक्य झाले असते… तेव्हा हा कामगार स्वच्छता दूत होता. देशभर ताट, चमचे घेऊन घंटा नाद करून याच कामगारांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जात होते…

आज याच कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ESIC या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही… या कामगारांचे शोषण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कराराचे उलंघन केले असेल तर मुख्याधिकारी यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे. जर ही कारवाई मुख्याधिकारी यांनी केली नाही तर मुख्याधिकारी वर्गावर, मा. आयुक्त तथा संचालक यांचे दि. २६ ऑगस्ट २०२४ च्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने या मुख्याधिकारी वर्गावर आणि संबंधित अधिकारी वर्गावर यांच्यावर कारवाई करणेबाबतचे लेखी आदेश दिलेले आहेत… जो पर्यंत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई होऊन आणि कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार आहे…  या लढ्याचे कामगार नेते अनिल जाधव, संतोष पवार यांनी माहिती दिली…