कालवा रोडवरील १७ घरे अधिकृत करण्याची मागणी… समीर सपकाळांनी खासदारांची भेट घेऊन केली कार्यवाहीची विनंती…

0
14

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

कालवा रोड येथील सर्व्हे नंबर 268 या शासकीय भूखंडावर उभारण्यात आलेल्या १७ घरांना अधिकृत करण्याच्या मागणीसंदर्भात माजी उपनगराध्यक्ष समीर सपकाळ यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली.

या मागणीची दखल घेत खासदार तटकरे यांनी यावर सकारात्मक चर्चा करत तात्काळ प्रांताधिकारी व मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्याशी संपर्क साधून यावर जलदगतीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले. या निर्णयामुळे संबंधित घरधारकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून या मागणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल समीर सपकाळ यांचे कौतुक होत आहे.