रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भुवनेश्वर येथील जागेमध्ये क्रिकेट स्टेडियम रोहा या कामाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, त्याचप्रमाणे रोहा मच्छी मार्केट ते स्मशानभूमी बायपास येथील असलेल्या कैलासवासी रामभाऊ दिवेकर मार्ग याचे सुद्धा भूमि पूजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या पुढील काळात क्रिकेट कबड्डी सह बॅटमिंटन ,कॅरम, टेबल टेनिस अशा विविध खेळांच्या स्टेडियमचे स्वप्न सुद्धा रोहेकरांचे पूर्ण होणार आहे असे अश्वशीत केले. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हे स्टेडियम रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम असेल राज्यातील विविध स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातील असे सांगितले. पत्रकारांशी बोलत असताना रोह्यातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा होणारा त्रास याचा प्रश्न उपस्थित केला असता तटकरे यांनी रोहा नगरपालिका, रोहा पोलीस स्टेशन ,आणि रोहा तहसील कार्यालय यांनी मिळून यांचे योग्य नियोजन करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात रोह्यातील मुख्य रस्ता सुसज्ज करून मुख्य रस्त्यावरील गटारांची आणि डिव्हायडर मधील स्टीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आश्वासित केले. यावेळी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजयकुमार एडके, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे, समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर ,मयूर दिवेकर ,समीर सकपाळ त्याचप्रमाणे नगरसेवक राजू जैन ,रवींद्र चाळके ,मयूर पायगुडे शहराध्यक्ष अमित उकडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पासिलकर,जिल्ह्याचे सरचिटणीस विजयराव मोरे , सुरेश मगर ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच रामाशेठ म्हात्रे माजी सरपंच अमित मोहिते ,नरेश पाटील सदस्य शांतीशिल तांबे ,किशोर पाटील , उतेश कांबळे तसेच समाजसेवक बिलाल मोरबेकर अधिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते…