महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ महाड-पोलादपूर मुस्लिम समाजातर्फे आज निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.निष्पाप लोकांवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रकार भारतीयांच्या सामाजिक एकतेला तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे, अशा शब्दांत मुस्लीम समाजाने या हल्ल्याची निंदा केली आहे. भारत सरकारने देशाच्या या शत्रुना कठोरात कठोर शिक्षा करावी, जेणेकरुन पुन्हा असा भ्याड हल्ला करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे आवाहनही मुस्लीम समाजाने केंद्र सरकारला केले आहे.
या हत्याकांडाच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता छ शिवाजी महाराज चौक, महाड येथें निषेध सभेचे आयोजन मुस्लीम समाजातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त करावी, असे आवाहन मुस्लीम समाजातर्फे करण्यात आले आहे.