संत गोरोबा काका यांची ७०८ वी पुण्यतिथी सोहळा… संत नामदेवांच्या जयघोषात म्हसळ्यात पालखी सोहळा…

0
20

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वैभव कळस):- 

संत गोरोबा काका यांची ७०८ वी पुण्यतिथी सोहळा म्हसळा तालुका श्री संत गोरोबा कुंभार समाजातर्फे म्हसळा येथील कुंभार समाज मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन विधीव्रत पद्धतीने करण्यात आले.या निमित्ताने श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले.

पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संत गोगोबा काका यांच्या प्रतिमेची पालखी – दिंडी भजन-किर्तनाच्या गजरात,टाळ-मृदुगांच्या तालासुरात विठुराया,सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यांच्या जयघोषात काढण्यात आली.संपूर्ण शहरभर सुंदर असे भक्तिमय वातावरण पसरले होते.त्याप्रसंगी कुंभार समाज अध्यक्ष नंदू गोविलकर, श्री संत गोरोबा काका नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष सुनिल अंजर्लेकर, श्रीवर्धन -म्हसळा कुंभार समाज मुंबई माजी खजिनदार गजानन चेऊलकर, स्थानिक कमिटी खजिनदार नंदू गोविलकर, सचिव सुजित बोरकर, सुरेश कुडेकर, गणेश बिरवाडकर, श्रीवर्धन -म्हसळा कुंभार समाज युवा अध्यक्ष अभय कलमकर, भाई बोरकर, मंगेश बोरकर,विठोबा म्हशीलकर महिला मंडळ अध्यक्षा वासंती म्हशीलकर, उपाध्यक्षा शालिनी गोविलकर,वंदना वसंत बिरवाडकर,राधीका म्हशीलकर, दिनेश म्हशीलकर,महिला आणि पुरुष मंडळींच्या सुस्वर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. समाजाच्या विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

संत गोरोबा काका महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते.संत गोरोबा काका इ. स.१२६७-१० एप्रिल १३१७ या काळातील संत होते. त्यांनी अनेक अभंग लिहिले लिहिले असून ते विठ्ठलाचे (पांडुरंग ) यांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ ( १० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली.