शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो (पनवेल):-
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या तत्त्वज्ञानाने घडवलेली शिवसेना, आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी प्रेरणेतून पुढे वाटचाल करत आहे. या तेजस्वी वाटचालीचे एक निष्ठावंत शिलेदार म्हणजे योगेश तांडेल.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व, आदित्य ठाकरे यांची ऊर्जा, आणि जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे मार्गदर्शन या त्रिवेणी संगमातून योगेश तांडेल यांची राजकीय घडामोड आकार घेत आहे. राजकारणात यशाची शॉर्टकट वाट निवडणाऱ्यांच्या गर्दीत, योगेश तांडेल यांनी निष्ठा, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या वाटेवरून पाय रोवले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, रायगड व कोकण परिसरात ते एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. पण उद्योजकतेच्या झगमगाटात त्यांनी शिवसेनेच्या झेंड्याला आपली खरी ओळख मानली. आपल्या कष्टाच्या कमाईतून शिवसेनेचा विस्तार साधणाऱ्या मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते.
शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळात,कित्येकांनी निष्ठा गमावली…मात्र जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वात योगेश तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निष्ठेचा गड अखंड टिकवला.
कारण त्यांच्यासाठी ‘शिवसेना’ ही एक भावना आहे, एक संस्कार आहे, एक ध्यास आहे!
२८ एप्रिल — योगेश तांडेल यांचा जन्मदिवस — हा फक्त एका व्यक्तीचा वाढदिवस नाही, तर निष्ठेच्या विचारांचा जल्लोष आहे. साध्या शिवसैनिकांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या शुभेच्छांनी हा दिवस भारून जातो. मोबाईल, सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटी या सर्व माध्यमांतून प्रेमाचा वर्षाव त्यांच्या दिशेने वाहतो.
एक एक माणूस जोडत, एक एक विश्वास पेरत’, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल शिवसेनेची शाखा अधिक मजबूत करत आहेत. त्यांच्या निष्ठेने आणि कार्याने भविष्यात शिवसेनेच्या पायाभरणीत महत्त्वाचा दगड रोवला जाणार, यावर कुणाचाही संशय नाही.
‘शिवसत्ता टाइम्सकडून व लॅण्डमास्टर ग्रुपच्यावतीने या निष्ठावान नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा’