अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता…यात २७ जणांचा मृत्यू झाला होता…२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता…यात २७ जणांचा मृत्यू झाला होता…याचे पडसाद रायगड जिल्हा सहित देशात उमटले असून मुस्लिम समाजाच्यावतीने या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत काळया फिती दंडाला बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. अलिबाग मुस्लिम समाजाने मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या मशीद पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅलीचे आयोजन केले होते…
काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अलिबाग येथील मुस्लिम समाजातील नागरिक बाजारपेठ येथील मशिदीजवळ एकत्र जमले होते.यावेळी अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. असेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली…यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील व्यक्ती उपस्थित होत्या.यावेळी भाजपचे अलिबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा नसीम बुक बाईंडर, वसीम साखरकर, अशरफ घट्टे, जफर सय्यद, फरीद सय्यद,दानिश शेख आदी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.