मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
अतिशय दुःखद बातमी…! प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचे दुःखद निधन. प्रकाश भेंडे यांचे वृद्धपकाळाने निधन झाल्याचे सांगितले असे कळते, काल २८ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होते. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांचा प्रेमविवाह होता. दोघांनीही मराठी चित्रपटातून एकत्रित काम केले होते. प्रकाश भेंडे यांनी मराठी चित्रपटात अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, नाते जडले दोन जीवांचे अशा चित्रपटातून त्यांनी अभिनेते तसेच दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
प्रसाद आणि प्रसन्न ही त्यांची दोन मुलं. प्रसाद हा सिनेमॅटोग्राफर आहे. तर त्यांची सून श्वेता महाडिक ही हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तर प्रसन्न भेंडे हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असून पत्नी किमया देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे.