बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे हेच ध्येय… शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने भव्य रोजगार मेळावा…

0
49

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

विधानसभा निवडणुकीत जवळ-जवळ ५ हजार बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मी दिले होते…विधानसभेत जरी निवडून आलो नसलो तरी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य मी करीत राहणार असे अभिवचन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी पेण येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात दिले…शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथील पी.डी.पाटील सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी शिक्षणसम्राट अँड.पी.डी.पाटील, उद्योजक महेंद्र ठाकूर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, दीपक पाटील, अँड.रोशन पाटील, प्रथमेश गव्हाणकर, शेकाप चिटणीस प्रल्हाद पाटील, सुनंदा म्हात्रे, आकाश गावंड, विकी कदम आदींसह विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, कर्मचारी व बेरोजगार उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले कि, पेण तालुक्यासाठी हा तिसरा रोजगार मेळावा घेत असून अनेक बेरोजगारांनी याचा लाभ घेतला आहे.  यापूर्वी औद्योगिक, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा मेळावा होता, आज लॉजिस्टीक व विविध उद्योगाशी निगडित रोजगार मेळावाचे आयोजन केले आहे.पेण तालुक्यात खेडोपाडी फिरत असताना अनेक तरुण तरुणी उच्चशिक्षित असल्याचे निदर्शनास आले. परंतु अशा बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने योग्य संधी मिळाली नाही. या गोष्टीचा विचार करून अशा बेरोजगारांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. आपल्या सभोवताली तिसरी मुंबई होऊ पाहत असून एमआयडीसी, एमएमआरडीए, नैना सारखे प्रकल्प या भागात येणार आहेत. या प्रकल्पात माझा स्थानिक शेतकऱ्याना संधी कशी मिळेल, तसेच त्याचा विकस कसा होईल या दृष्टिकोनातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपली वाटचाल सुरु असून शेकाप हा नेहमी कष्टकरी, शेतकऱ्याच्या पाठीशी होता व राहील असे आश्वासन अतुल म्हात्रे यांनी दिले…

यावेळी अँड.रोशन पाटील यांनी सरकारवर टीका करीत आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना राज्यकर्ते जनतेशी भावनिक राजकारण करून फसवणूक करीत असल्याचे सांगितले. भांडवलदारांना पाठीशी घालून स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम होत असून शेतकरी कामगार पक्ष हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. आजच्या रोजगार मेळाव्यातून फक्त नोकरी देणे या ऊद्देश नसून त्या माध्यमातून तरुणाने आपले व स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोलाचे काम होणार आहे. आगामी काळात विविध प्रकल्पात अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी मिळवून देण्याचे काम होणार आहे असे शेवटी अँड.रोशन पाटील यांनी सांगितले…