हुक्का पार्लरवर धाड, सहा जणांवर कारवाई…

0
13

पनवेल शिवसत्ता टाइम्स ( दीपक कांबळे ):- 

खारघर पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाड टाकून कारवाई केली असून सदर ठिकाणी शासन बंदी असलेला हुक्का सर्रास वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कारवाई गुरुवारी करण्यात आली. खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर १० कोपरा गावालगत असलेल्या ब्लॅक फॉरेस्ट हुक्का पार्लर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेले तंबाखू जन्य पदार्थ वापरून हुक्का ओढला जात असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी एक बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. मिळालेली माहिती सत्य असल्याची खात्री पटताच या हुक्का पार्लरमध्ये गुरुवार सायंकाळी चार वाजेच्या  सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. प्रदीप आव्हाड, सहा. पो. उप. निरी. फिरोज आगा, पो हवा. सचिन गोसावी, अविनाश गायकवाड, राहुल डावरे पथक पाठवून कारवाई केली.यावेळी वेगवेगळ्या पद्धतीचे सुगंधित तंबाखूचे डबे, आणि हुक्का पॉट, पाईप्स अन्य सामान असे आढळून आले. हे सर्व सुमारे १,५५,५६० रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी व्यवस्थापक रोहित राजपूत, बुटासिंग जसपाल सिंग सह इतर चार जणांविरोधात विरोधात कारवाई करून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.