महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
पंचायत समिती महाडच्या सभागृहात आज “उमेद अभियान” अंतर्गत आयोजित खरीप हंगाम निम्मित पूर्व तयारी कार्यशाळेचा शुभारंभ मा. गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला… कार्यशाळेचे आयोजन खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन, सेंद्रिय शेती, पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, वृक्षारोपण, पशु लसीकरण, पशुचे – निवाऱ्याचे व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजना बाबत कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वछ ठेवू अभियान विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते…
यावेळी डॉ. स्मिता पाटील मॅडम म्हणाल्या की, “ग्रामीण भागातील शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची सखोल तयारी तसेच स्वछ भारत मिशन आयोजित अभियान मधून रोगराई मुक्त गाव ठेवण्यासाठी गावात स्वच्छता गरजेची आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगट, शेतकरी व ग्रामसंघांना बळकट करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे, कृषी सखी, पशु सखी यांच्या माध्यमातून ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येईल असा विश्वास दाखवला.”
या कार्यशाळेमध्ये तालुका अभियान व्यवस्थपाक श्री. संचित पार्टे यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करुन शेतीच्या माध्यमातून नवीन उपक्रम कशा प्रकारे निर्माण करता येतील, समुहाच्या शाश्वत उपजीविका निर्माण करणे या विषयी सखोल मार्गदर्शन केले… या कार्यशाळेस तालुका कक्षातील कृषी सखी, पशु सखी, कृषी उद्योग सखी, प्रेरिका उपस्थित होत्या… प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ही कार्यशाळा आंनदी वातावरणात संप्पन्न झाली….!