गौरवशाली ग्राम पंचायत यांना नेहमीच सहकार्य केले जाईल-खा. सुनील तटकरे…

0
17

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

आपल्या ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गौरवशाली ग्राम पंचायत यांना सर्व प्रकारची शासकीय मदत करण्यास आनंद होतो, असे गौरवशाली उदगार खासदार सुनील तटकरे यांनी काढले…. ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी सोलर दिवे आणि हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम, दिव्यांग यांना घर घंटी वाटप, ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पिशव्या वाटप, ग्राम पंचायत स्थापना पासून सरपंच पदाचा कारभार करणारे सरपंच यांचा सत्कार कार्यक्रम खासदार सुनील तटकरे व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते… यावेळी ग्राम पंचायत यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक करून ग्राम पंचायतीला मिळालेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल IOS हे नामांकन प्राप्त झाले आहे, हे प्रमाणपत्र खासदार सुनील तटकरे यांनी सरपंच उमा मुंढे यांच्या कडे दिले…. आपल्या प्रास्ताविक भाषणात खासदार सुनील तटकरे व आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद व्यक्त करून ग्राम पंचायत यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ५.० मध्ये वासंबे ग्राम पंचायत कोकण विभागात प्रथम असल्याचे सांगितले…. वासंबे ग्राम पंचायत व परिसर यांचा विकास करायचा असेल तर नगर परिषद होणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून, खासदार सुनील तटकरे यांनी सहकार्य करावे असे आमदार महेश बालदी यांनी सांगून विकास कामांना लागणारे आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले…. यावेळी संदीप मुंढे, सुरेश पाटील, कैलास म्हात्रे, राकेश खरड, लक्ष्मण परांगे, उपसरपंच पारंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….