माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी माणगाव शहरातील ख्रिस्ती बांधवांना प्रत्यक्ष भेट देऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.या प्रसंगी ज्ञानदेव पोवार यांनी एसव्हीडी, सर्व विकास दीप संस्था येते नाताळ सणाचे दिनी अर्थातच गुरुवार दि. 25 डिसेंबर, 2025 रोजी भेट देऊन सेंट आर्नॉल्ड चर्चचे धर्मगुरू, फादर थॉमस सेक्वेरा यांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक धर्मगुरू फा. मॅथ्यू तसेच एसव्हीडी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. माणगाव महसूल विभागाचे माजी सर्कल अधिकारी अजय जाधव यांच्या समवेत ज्ञानदेव पोवार यांनी एसव्हीडी हाऊसच्या प्रांगणात उभारलेल्या सुंदर नाताळ गोठ्याजवळ फा. थॉमस सेक्वेरा यांना पुष्पगुच्छ अर्पण करून सदिच्छा व्यक्त केल्या.
यानंतर पोवार साहेब यांनी मोर्बा रोडवरील वेद्रुना कॉन्ग्रिगेशनच्या सिस्टर्सद्वारे चालविण्यात येणाऱ्या अमरदीप ट्रस्टला भेट दिली. तेथे त्यांनी अजय जाधव यांच्यासह (सुपीरियर इन्चार्ज) संचालिका सिस्टर मंजुळा यांना नाताळ शुभेच्छा देत पुष्पगुच्छ अर्पण केला. यावेळी सिस्टर असुंता पाटील यांच्यासह समुदायातील अन्य सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर मा. नगराध्यक्ष पोवार यांनी आमच्या वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्या निवासस्थानी भेट देऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या तसेच नुकताच काही दिवसपूर्वी आमच्या प्रतिनिधी चे सासूबाईंच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दरम्यानाचा काळात उल्लेखनीय बाब म्हणजे, ज्ञानदेव पोवार दरवर्षी नाताळ सणानिमित्त शुभेच्छा देण्याची परंपरा जपतात. तसेच विविध नाताळ स्नेहमेळावे, उत्सव आणि कार्यक्रमांमध्येही ते नियमितपणे सहभागी होत असून, त्यांच्या या उपक्रमातून समाजात बंधुभाव, आपुलकी आणि एकतेचा संदेश दृढ होत आहे.

