रोह्याच्या मुख्य रस्त्याला नाल्याचे स्वरूप… 15 दिवस पलटूनही जैसे थै… खासदार तटकरेंच्या आदेशाला रोहा नगरपालिका अधिकाऱ्यांची केराची टोपली…

0
9

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोह्यातील मुख्य रस्त्यांना नाल्याचा स्वरूप आलेला पाहायला मिळतं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यामधील भुयारी गटारांमधून पाणी लिक होऊन हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे यामुळे रोहेकर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी सुमारे 50 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून रोह्यामध्ये भुयारी गटार योजना राबवण्यात येईल परंतु ही योजना कुठेतरी निकामी पडली की काय? असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे. रोह्यातील वस्तींचे सांडपाणी वाहून नेण्याचे काम हे भुयारी गटार करत आहेत परंतु हे भुयारी गटाराचे सांडपाणी हे सर्वत्रिकरित्या रोह्यातील मुख्य रस्त्यावर पसरला आहे . यामुळे अनेकदा गाड्या स्लिप होऊन अपघात सुद्धा होत आहे, तर हे पाणी महिला व नागरिकांच्या अंगावरून उडून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी गेल्या महिन्यात जवळपास तीन वेळा रोहा नगरपालिका येथे बैठक घेत अधिकाऱ्यांना चांगलेच झापून रोह्यातील अनेक प्रश्न सोडवण्याच्या आधीच दिले होते. रोह्यातील मुख्य रस्त्या बाजूतील पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे असतील ,अथवा मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर मधील स्ट्रीट लाईट असतील ,त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम असतील अशा अनेक समस्यांवर बारकाईने लक्ष देऊन कारवाई करण्याचे आदेश खासदार तटकरे यांनी दिले होते परंतु यावर अजूनही कोणतीही कारवाई न झाल्याने खासदार तटकरेंच्या आदेशाला रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रोहा नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवलेले पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी रोहा नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झालेली समजण्यात आली यावेळी नगरपालिका कर्मचारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी संप पुकारून रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले,त्याचप्रमाणे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्याधिकारी स्वतः रस्त्या उतरणार का ?असा सुद्धा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.