पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेत चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील स्वस्तिक सतीश भोसले या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद सोलापूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय युनिफाईड स्पर्धा २०२४-२०२५ दि.२९ व ३० एप्रिल दरम्यान सोलापूर (नातेपुते) येथे १७ वर्षाखालील मुले आणि ५७ वजन गटात पार पडलेल्या स्पर्धेत नवीन पनवेल येथे चांगु काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यम मधील इयत्ता ९वी चा स्वस्तिक सतीश भोसले या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्याची नॅशनल लेवल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
स्वस्तिक भोसलेच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत,व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख,सचिव डॉ. एस.टी.गडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण,अशोक पाटील सर,भरत जितेकर सर, प्रकाश रिसबुड सर, विद्यालयातील पर्यवेक्षक,मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वस्तिकचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात…