उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. ७ मे २०२५ रोजी हा प्रवेश थाटात पार पडणार असून, अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
या पत्रकार परिषदेला जे.एम.म्हात्रे, प्रीतम म्हात्रे तसेच आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घकाळापासून पक्षात डावललं जात असल्याच्या कारणाने जे. एम. म्हात्रे नाराज होते. आज या नाराजीचा उद्रेक झाला आणि त्यांनी थेट भाजपची वाट धरली. जे.एम.म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे भाजपात प्रवेश करणार असल्याची सर्वप्रथम बातमी शिवसत्ता टाईम्स ने २३ मार्च रोजी दिली ति तंतोतंत खरी ठरली.यांच्या प्रवेशामुळे शेकापच्या उरल्या-सुरल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. जे.एम.म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांच्या सोबत कोणकोण भाजपात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शेकापचे पदाधिकारी मात्र आत्मविश्वासात नेते जातात, कार्यकर्ते नाही…आमचे कार्यकर्ते ठाम आहेत!” असा दावा शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.पण खरा निर्णय आता जनतेच्या कोर्टात होणार आहे.