चिमुरड्या अन्वीच्या अदांवर हिंदवी पाटील फिदा… गोरेगावातील कार्यक्रमादरम्यान अन्वीने केलं लावणी नृत्य… 

0
16

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर ):- 

लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील यांनी गोरेगावमधील चिमुरड्या अन्वीचं कौतुक केलंय… हिंदवी पाटील रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये समाज सेवक नरेश आहिरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमासाठी आल्या होत्या…यावेळी गोरेगावमधील बालकलाकार अन्वी गोरेगावकर हिने यावेळी लावणी सादर केली…चिमुरड्या अन्वीची नृत्य,अदा पाहून हिंदवी थक्क झाल्या आणि अन्वी सोबत नृत्य करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. एवढंच नाही तर अन्वीने सादर केलेल्या नृत्यावर खुष होत हिंदवी यांनी आपल्या बोटातील अंगठी अन्वीच्या बोटात घालत तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.