माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते राजकारणात पुन्हा सक्रिय… उद्धव ठाकरेंकडे मागितली कोकणाची जबाबदारी…

0
15

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

मागील काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोकणात गळती लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे, पवार, भाजप चा झेंडा हाती घेतला हे थांबविण्याठी ठाकरे सेनेकडून कोणतीही पावले उचलली जात नसताना आता अनंत गीते हे पुढे आल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर फारसे कुठेही न दिसणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आता ॲक्टीव्ह मोड वरती आले आहेत त्यांनी कोकणात पक्षाची बांधणी करण्याकरिता पुढाकार घेतला असून याकरिता उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरती जबाबदारी सोपवावी अशी इच्छा व्यक्त केली गोरेगाव येथील नरेश आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आले असताना गीते बोलत होते…