महाड शिवसत्ता टाइम्स ( निलेश लोखंडे ) :-
महाड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत वरंध गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सव 2025 ला ५ मे रोजी भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली असून, ६ मे रोजी या यात्रेची सांगता होणार आहे… ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी भरलेला आहे…पहिल्या दिवशी महापूजा, श्रींची भव्य आरती आणि मिरवणूक पार पडली…ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक संपूर्ण गावाला भक्तिरसात न्हाऊन गेली…
यात्रेतील मुख्य आकर्षण:-भव्य आर्केस्ट्रा–रंगमंचावर सादर होणारा सांगीतिक जल्लोष,पारंपरिक बैलगाडी शर्यत–ग्रामसंस्कृतीचे जिवंत दर्शन,नैवेद्य वितरण–सर्व भाविकांसाठी भक्तिभावाने दिला जाणारा प्रसाद,कुस्ती स्पर्धा–नामवंत पैलवानांच्या दमदार झुंजी,६ मे रोजी यात्रोत्सवाची सांगता विशेष धार्मिक विधी आणि कुस्तीच्या अंतिम सामन्यांनंतर होणार आहे.वरंध ग्रामस्थ व देवस्थान समिती यांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन गौरवशाली परंपरेचा हा यात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करत आहे.”श्री भैरवनाथ महाराज की जय!” या जयघोषात वातावरण भक्तिरसात दुमदुमले आहे…