खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या इस्टूल वाडीमध्ये काल रात्री लग्नसमारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणे दोन भावांना महागात पडले असून झालेल्या भांडनात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे…खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मे च्या रात्री बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभा निमित्त हळदीचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मंदधुंद होऊन नाचत होते… व त्यांनी नाचताना शर्ट काढून ते नाचू लागले म्हणून त्या आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले व येथे मुली महिला नाचत आहेत..त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असे सांगितले. तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता (उलाथने) उचलला व विलास वाघमारे याच्या डोक्यात व हातावार माराला तशी विलास च्या डोक्यात मोठी जखम झाली व तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला व भांडणे मिटवायला आलेला विलासचा मोठ्या भाऊ अनंता च्या छातीवर जोरदार त्या कालत्या ने उपटी टाकल्या.
दरम्यान दोन्ही भावाना रिक्षाने खोपोलीत आणण्यात आले पण यात मोठा भाऊ अनंता वाघमारे हा रुग्णालयात पोहचयच्या आत त्याची प्राणजोत मालावली. तर विलास वाघमारे याच्या डोक्यात सहा टाके पडले…सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते पण त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले पण दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा काही मिळून आला नाही त्याचा शोध खोपोली पोलीस घेत आहेत…