रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहा तालुका कार्याध्यक्ष आणि रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष समिर भाई शेडगे यांचा वाढदिवस रोहा शहरात अतिशय उत्साहात, दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून समिर भाईंना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रोहा शहरात उत्सवाचे वातावरण होते. सर्वत्र “समिर भाई” नावाने उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रेमाने, स्वखुशीने आणि निष्ठेने कार्यक्रमात सहभाग घेतला. शहरातील विविध भागांतून नागरिक स्वतःहून उपस्थित राहत समिर शेडगे यांच्यावर असलेले जनतेचे प्रेम अधोरेखित करत होते.
समिर शेडगे हे नाव म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार, जनतेचा आवाज आणि पक्षाचा खंबीर खंबा. प्रशासनात अनुभव, नेतृत्वात आत्मविश्वास, आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता – या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे समिर भाई. त्यांनी रोहा नगराध्यक्षपदाच्या काळात घेतलेली ठोस निर्णयक्षमता, पारदर्शक कारभार आणि लोकांशी जोडलेले नाते आजही शहरवासीयांच्या लक्षात आहे.
कार्यक्रमात कुठलाही तामझाम न करता, पण अत्यंत नेटकेपणाने आणि शिस्तबद्धपणे वाढदिवस साजरा करण्यात आला.स्वागत, सत्कार आणि शुभेच्छांचा ओघ इतका मोठा होता की, समिर भाईंच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला.
शहरातील प्रमुख व्यापारी, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची प्रत्येक तयारी काळजीपूर्वक करण्यात आली होती. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अत्यंत नेटकेपणाने पार पाडण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट, पुढील काळात अधिक जोमाने आणि निष्ठेने कार्य करत राहण्याच्या निर्धाराने झाला.समिर भाई”नावातच दम आहे, आणि कामगिरीत तर जनतेचा विश्वास आहे!