पनवेल शहर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन व ऑलआऊट अभियान… गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर व कायदा तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई…

0
12

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी केलेल्या सुचनेनुसार राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत, नवी मुंबई आयुक्तालयअंतर्गत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व ऑलआऊट अभियान राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर व विविध कायदा तोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

कॉम्बिंग ऑपरेशन” चा मुख्य उद्देश म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात गुन्हेगारी किंवा दहशतवादासारख्या घटनांशी संबंधित लोकांना शोधणे किंवा पकडणे. या ऑपरेशनमध्ये पोलीस किंवा सुरक्षा दल एका भागाला फिरून, चौकशी करून, आणि संशयितांचा शोध घेतात.

कोंबिंग ऑपरेशन व ऑलआऊट कारवाई ही पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पो.नि. शाकीर पटेल,व पो.उ.नि.अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवडेकर,गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे,पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अस्पतवार,महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे,पोलीस उपनिरीक्षक शेलार,पोलीस उपनिरीक्षक परागे,पोलीस उपनिरीक्षक पठाण,पोलीस उपनिरीक्षक वायकर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार, प्रतिबंधक पथकातील अंमलदार,पोलीस ठाण्यातील समन्स वॉरंटची बजावणी करणारे अंमलदार,अमली पदार्थ विरोधी पथकातील अंमलदार व एटीसी पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते.

सदर कारवाईत एन.डी.पी.एस.कायद्यानुसार सेवन एक, बी.एन.एस.287अंतर्गत एक,देशी दारू विक्री 65 (ई) अंतर्गत एक,दारूबंदी अधिनियम 85 अंतर्गत दोन,मोटार वाहन कायदा 185अंतर्गत एक,COTPA अंतर्गत सहा, एम पी ऍक्ट 33(डब्ल्यू)अंतर्गत दोन, जुनी व नवी वॉरंट बजावणी सहा समन्स बजावणी नऊ, चार हिस्ट्रीसीटर असणारे यांची तपासणी केली असता तीन मिळून आले. पाहिजे असणारे सात आरोपी यांचा शोध घेतला मात्र कोणीही मिळून आले नाही, गुंड प्रवृत्तीचे सहा गुंडाचा शोध घेतला मात्र चार  जण मिळून आले. तसेच मोटार वाहन कायदा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई,शिवशंभू नाका येथे नाकाबंदी दरम्यान 79 वाहनांची तपासणी, 27 वाहनांवर कारवाई,नवनाथ नगर झोपडपट्टी व रेल्वे स्थानक परिसरात परकीय नागरिकांचा शोध व हॉटेल / लॉज तपासणी करण्यात आली.नवनाथ नगर झोपडपट्टी व रेल्वे स्टेशन परिसर येथे कोंबिंग ऑपरेशन राबवून सदर ठिकाणी परकीय नागरिक अथवा बांगलादेशी नागरिक यांचा  शोध घेतला असता कोणीही संशयित इसम मिळून आलेले नाहीत.शहरात वाहनचोरी तसेच इतर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे…

वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दोन दिवसीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते…अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली आहे.