बीडीडी चाळ जल्लोषात ५६० घरांचे स्वप्न पूर्ण पण आदित्य ठाकरे गायब?… चावी वाटपाचा सोहळा भव्य…स्थानिक आमदाराच्या भाषणाचे लॉक मात्र बंद…

0
5

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

मुंबईच्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा…मोठा दिवस, मोठा कार्यक्रम, आणि मोठं चावीचं स्वप्न पूर्ण होणार…पण या मोठ्या क्षणात एक मोठी कमतरता… ती म्हणजे आदित्य ठाकरे गायब असण्याची शक्यता आहे…बीडीडी चाळ पुनर्विकास सोहळ्यात आदित्य ठाकरे ‘गैरहजर राहणार का?भाषणाचा नंबरच नाही…

बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल ५६० घरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. मोठ्या जल्लोषात चावी वाटप होणार असले, तरी या सोहळ्यात एक महत्त्वाचा चेहरा मात्र गहाळ असणार अशी शक्यता आहे – स्थानिक आमदार आदित्य ठाकरे.स्थानिक आमदार म्हूणन आदित्य ठाकरे यांचं भाषण अपेक्षित आहे पण कार्यक्रम रूपरेषा मध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे भाषण आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव असलं,तरी कार्यक्रम रूपरेषेत भाषणाचा उल्लेखच नाही. त्यामुळे “आपल्या आमदाराचं बोलणं तरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा बाळगणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीची कुजबुज सुरू आहे.राजकीय वर्तुळात यावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत…एकंदरीत, घरांच्या चाव्या मिळण्याचा आनंद आहे; पण आपल्या स्थानिक आमदाराच्या भाषणाचं लॉक मात्र अजूनही उघडलं नाही!

तर मंडळी,560 घरांच्या चाव्या वाटल्या जातील, लोकांचं स्वप्न पूर्ण होईल…पण एक रिकामी खुर्ची मात्र कायम लक्ष वेधून घेईल…आता या खुर्चीवरून पुढे कोणत्या राजकीय कथा लिहिल्या जातील… ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे…