मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून महिला प्रवाशाचा मृत्यू… महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू…

0
4

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

गोवे गाव हद्दीत मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजता मत्स्यगंधा एक्सप्रेस (12619) मधून पडून सविता हिरालाल मखवाना (30, रा.अहमदाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला…सायंकाळी सुमारे 6 वाजता मुंबईकडून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12619) मधून प्रवासादरम्यान महिला प्रवासी गोवे गावच्या हद्दीत (रेल्वे पोल क्र. 7/35) पटरीजवळ पडली.या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, पोलीस पथक तसेच रेस्क्यू (SVRSS) टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्यात आली असून मृत महिला सविता हिरालाल मखवाना (वय 30, रा. मेघानी नगर, शेरी-7, रणपूर, अहमदाबाद, गुजरात) अशी आहे. या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे अंमलदार एस. जी. भोजकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.