नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
११ ऑगस्टच्या पहाटे नेरळ पोलीस ठाण्यात फोनद्वारे माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती एका ठिकाणी थांबल्या असून परिसरात उग्र वास पसरला आहे. प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.गावकऱ्यांनी तत्परतेने आरोपींना पकडून ठेवले होते. तपासात संशयितांकडे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ आणि भार्फाच्या लाद्या आढळल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १६ लाख ४६ हजार आहे.
या प्रकरणात जावेद अहमद शेख, सचिन राममिलन जयस्वार, मोहम्मद जाफर मोहम्मद अली, अमित अशोक कुमार कोरी, भरत सिद्धेश्वर जाधव या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी लक्ष्मण देवराम फासळ फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि तपासी अधिकारी नितीन मंडलिक यांच्या पथकाने केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नागरिकांनी, विशेषत: फार्महाऊस मालकांनी, कोणालाही राहण्यास देताना आवश्यक कायदेशीर तपासणी करावी व सतर्क राहावे. पोलिस नेहमीच जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत.