घोणसे घाटात गंभीर अपघात…संरक्षक भिंतीमुळे प्राण आणि वित्तहानी वाचली…

0
7

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

जळगाव-पुणे-माणगाव-म्हसळा- दिघी या राष्ट्रीय महामार्ग क्रं. F.753 वर माणगावहून म्हसळ्याकडे येत असताना 19व्या कि.मी.मध्ये घोणसे घाटातील तिव्र वळण आणि शीघ्र उताराच्या अपघात प्रवण रस्त्यावर आज सकाळी 10.15 च्या सुमारास HGV या 16 चाकी अवजड ट्रक क्रं. MH04HY7255 या गाडीलाअपघात झाला,माणगाव हून म्हसळ्याकडे येत असताना 19व्या कि.मी. मध्ये  घाटातील तिव्र वळण आणि शीघ्र उतारावरील धोक्याच्या वळणावर  घोणसे घाट संघर्ष समितीने पाठपुरावा करून बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे प्राण आणि वित्त हानी झाली नसल्याचे स्थानिकानी सांगितले… दरम्यान २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी खासदार तटकरे यांनी म्हसळा तालुका नियोजीत दौऱ्यात घोणसे घाट अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली…अपघात स्थळावर नेमक्या कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या सुधारणा करणे बाबत आपण विशेष पाठपुरावा करू असे सांगून घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात शुन्य अपघात होतील याची दक्षता घेतली जाईल असे अश्वासन देऊनही अद्यापही  काहीही सुधारणा न केल्याने अपघात सुरुच आहेत असेही ग्रामस्थानी सांगितले.