महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तिरंगा रॅली… भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन…

0
12

महाड शिवसत्ता टाइम्स निलेश लोखंडे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ महाडमध्ये रविवारी शिवसेना शिंदे गटाच्यावतीनं तिरंगा रॅली काढली.पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलाय. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. रायगडातील प्रत्येक तालुक्यातील शहराच्या ठिकाणी स्वतंत्र तिरंगा रॅली काढण्यात आली..महाड शहरातही मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत ऑपरेशन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक उपस्थित होते…सेवा निवृत्त सैनिकांचा महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..भारतीय संरक्षण दलाचा विजय असो.. जय जवान जय किसान. भारत माता की जय अशा घोषणा देत तिरंगा रॅलीला सुरुवात झाली…