रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी ऐतिहासिक इतिहास घडू शकतात असे गौरव्दगार उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मोहोपाडा येथे व्यक्त केले…
वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार दि.८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप आ.बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार महेश बालदी पुढे बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच ऐतिहासिक इतिहास घडवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृष्णाशेठ पारंगे यांना तळागाळातील गोरगरीब जनतेविषयी आत्मीयता व आपुलकी असून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करत एक अनोखा उपक्रम या निमित्ताने राबवल्याने कृष्णाशेठ पारंगे यांचे आमदार महेश बालदी यांनी कौतुक करत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात यापुढे बोलताना आ.बालदी पुढे म्हणाले की, आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन मोठे झालो आहेत याचा आम्हाला गर्व अभिमान आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये संस्कार शिकवले जातात आणि याच संस्कार रुपी शिक्षणामुळे आदर्श विद्यार्थी घडले असून आज जि.प.शाळेत शिकलेलेअनेक विद्यार्थी आमदार,खासदार मंत्री कलेक्टर अशा उच्च पदावर आहेत याचा गर्व व अभिमान वाटतो. कॉन्मेंट शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी पदव्या घेऊन इंजिनीयर डॉक्टर होतात आणि परदेशात जाऊन नोकरी करतात मात्र काहीजण आपल्या जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात अशी खंत ही आ.बालदी यांनी व्यक्त केली.परंतु जि.प.मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना गरिबीची व परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी चांगले संस्कार आत्मसात केल्याने सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,शासकीय वैद्यकीय व क्रीडा अशा विविध उच्च पदावर जावुन जनसामान्यांची सेवा करताना दिसून येतात. कृष्णाशेठ पारंगे हे या परिसराचे नेतृत्व करतात नेतृत्व करत असताना जनसामान्यांची नाळ त्यांना माहीत असल्यामुळे आज त्यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आमदार बालदी यांनी त्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक,क्रीडा, वैद्यकीय,पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णाशेठ पारंगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.