महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा… रामदास आठवले यांची संसदेत महाबोधी व्यवस्थापन बदलण्याची मागणी…

0
3

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. या पवित्र स्थळी उभारलेल्या महाबोधी महाविहारला जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान मानले जाते. सध्या महाविहारची व्यवस्था १९४९ च्या बी टी अॅक्ट अंतर्गत ४ बौद्ध व ४ हिंदू ट्रस्टी आणि कलेक्टर यांच्यांद्वारे केली जाते.
आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी यामध्ये बदल करण्याची मागणी करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. त्यांनी महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्याचा आग्रह व्यक्त केला. या भेटीत ना. आठवले यांनी ‘सिन्दूर ऑपरेशन’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच, रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय स्तरावर एनडीएचा घटक असून महाराष्ट्रात महायुतीत आहे, मात्र राज्यात पक्षाला सत्तेत वाटा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.याशिवाय, मुंबईतील इंदुमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन त्यांनी पंतप्रधानांना आठवण करून दिले.