अवकाळी पावसाचा रोह्यात जोरदार धुमाकूळ… रोहा आडवी बाजारपेठेत पूरजन्य परिस्थिती…व्यापाऱ्यांचे नुकसान…

0
31

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात वीज ,ढगांच्या गडगटासह अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहिला मिळाला.अवकाळी पावसाने रोहा येथे जोरदार धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले आहे, तसेच काही ठिकाणी शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.खासकरून आठवडा बाजार जलमय झाला आहे,ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे…

बाजारपेठ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले. अवकाळी पावसामध्येच पाण्याचा निसरा योग्यरीत्या होत नसल्याने रोहा नगरपालिका योग्य तो उपाययोजना करण्यामध्ये अपयशी पडली की काय?असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.यावेळी लगेचच माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व माजी नगरसेवक महेश कोलटकर यांनी घटनेची तात्काळ पाहणी केली व प्रशासनाला योग्यरीत्या सूचना दिल्या…यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गांनी केली आहे…त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे…भातशेतीची कापणी आणि झोडणी सुरू असताना पावसाने धुमाकूळ घातल्याने भात पिकाचा दर्जा खालावण्याची भीती आहे.प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गटाराची गाळ काढली आहे…त्यामुळे व्यापारी यांनी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व महेश कोलटकर यांचे आभार व्यक्त केले…