कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळ पूर्व भागात एस. टी. बस स्थानक असून ग्रामीण भागातील जनता एस. टी. ने प्रवास करीत असतात…परंतु पावसाळा सुरु झाला की या परिसरात पावसाचे पाणी तुडुंब साठते व त्त्याचा त्रास सहन करावा लागतो…त्या अनुषगाने सरपंच महेश विरले व आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्याने नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून १० आणि १५ असे २५ लक्ष निधी उपलब्ध करून घेण्यात यश आले आहे…व येत्या सोमवारी येथील गटारे व बस स्थानक परिसराचे भुमी पूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार आहे…