मुसळधार पावसामुळे त्रिमूर्ती नगरात पावसाचे पाणी साचले… समीरभाई सकपाळ,महेश कोलटकर यांची मदतीसाठी धाव…

0
21

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा शहरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला.या मुसळधार पावसामुळे त्रिमूर्ती नगर भागात रस्त्यांवर आणि घरासमोर खूप पाणी साचले.त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.काही ठिकाणी गटारे भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आणि लोकांची ये-जा अडचणीत आली.

परिसरातील नागरिकांनी तातडीने माजी नगरसेवक समीरभाई सकपाळ आणि माजी नगरसेवक महेश कोलटकर यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.दोघांनीही एकही क्षण न गमावता भर पावसात घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी कामगारांना बोलावून गटारांची चोकअप करून घेतली. अडलेले पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला आणि नागरिकांना दिलासा मिळवून दिला.

ही पहिलीच वेळ नाही की समीरभाई सकपाळ मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांचा लोकांशी असलेला संपर्क आणि तत्परता यामुळे अनेकदा सामान्य नागरिकांना वेळेवर मदत मिळते.गरज पडते तेव्हा ते स्वतः पावसात भिजूनही मदतीसाठी धाव घेतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

महेश कोलटकर यांचाही या कामात मोलाचा सहभाग होता…दोघांनीही स्थानिकांच्या समस्या समजून घेऊन लगेच उपाययोजना केल्या. या त्यांच्या कामामुळे त्रिमूर्ती नगर परिसरातील पाणी हळूहळू ओसरले आणि जनजीवन पूर्वपदावर आले.या मदतीबद्दल परिसरातील रहिवाशांनी समीरभाई सकपाळ आणि महेश कोलटकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.अशा लोकप्रतिनिधींची गरज प्रत्येक परिसराला आहे,अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.आणि यावेळी त्या प्रभागामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याला सडेतोड उत्तर देताना महेश कोलटकर हे म्हटले की आमच्या प्रभागामध्ये हस्तक्षेप कराल तर याद राखा असा थेट इशारा महेश कोलटकर यांनी दिला