उरण शहरात अनेक धोकादायक गटारे जैसे थे…  उरण शहरातील नाले सफाई निकृष्ट दर्जाची…

0
29

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):- 

उरण नगरपालिका शहरातील अनेक गटारे धोकादायक असून उरण मच्छीमार्केट  जवळील गटारावरील सळ्या निखळून पडल्या आहेत…तर झाकणे गायब झाली आहेत.सदर मच्छिमार्केट नेहमीच गजबजले असते तसेच पावसाच्या पाण्याने भरलेले असते.तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या बंगल्याच्या कॉनरच्या गटाराला देखील झाकण नाहीत…अनेक वर्षांपासून उघडी आहेत…तिथे अपघाताची दाट शक्याता आहे.बाजारपेठेतील गटारे देखील उघड्या अवस्थेत आहेत.उरण नगरपरिषदेकडून दरवर्षी शहरातील नाले सफाईसाठी लाखो रुपयाची टेडर काढली जातात.पण कंत्राटदार नाल्यातील गाळ न काढता फक्त नाल्यातील झाडे तोडतात…नालेसफाईमध्ये एकच कंत्राटदार अनेक वर्षांपासून काम करीत आहे…अनेक धोकादायक गटारे उघड्यावर आहेत. तसेच पावसाचे मौसम सुरु आहे…त्यामुळे मोठी जिवितहानी होऊ शकते…याला जबाबदार नेमकं  कोण?याबाबतीत उरण नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी…व आरोग्य विभागानेही तातडीने लक्ष दयावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे…